उन्हाची दाहकता टाळा; कोंबड्यांना सांभाळा

यंदा ऐन मार्चच्या तोंडावरच उन्हाचा कडाका पडला आहे. पुढील काळात तर मागील हंगामापेक्षा जोरदार दाहकता वाढण्याची शक्यता हावामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशावेळी पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्यांची काळजी न घेतल्यास त्यांना मोठा तोटा साहन करावा लागू शकतो. उन्हाच्या याच दाहाकातेपासून संरक्षण करून कोंबड्यांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी व्यावसायिकांवर असणार आहे.

ब्रॉयलर कुक्कुटपालन करतानाच उन्हाची काळजी घेऊन शक्यतो शेडची उभारणी केली जाते. मात्र, तरीही तापमानातील चढ-उतार व अनपेक्षितपणे त्यत होणारी वाढ कोंबड्यांची मरतुक वाढण्यास जबाबदार होऊ शकते. ६५ ते ८० अंश फॅरानाइट यां तापमानात ब्रॉयलर कोंबड्यांची वाढ चांगली होते. मात्र, ८१ ते ८५ या तापमानात खाद्य देऊनही त्याचे वजनात रुपांतर खूप कमी प्रमाणात होते. ८६ ते ९५ या तापमानात कोंबड्यांची खाण्याची क्षमता पाच टक्क्यांनी कमी होते. तर, ९६ पेक्षा जास्तीच्या तापमानात कोंबड्यांना उष्माघात होऊन त्याच्याच झटक्यात त्यांची मरतुक वाढते.

जास्त तापमानाने कोंबड्यांची मर टाळण्यासाठी शेडमधील तापमान नियंत्रित ठेवावे. त्यासाठी लोखंडी पत्रे असल्यास त्यावर सरमाड किंवा गवत व पालापाचोळा टाकावा. तसेच शेडच्या भोवती दाट सावली देणारी झाडे असावीत. तातडीच्या नियोजनासाठी शेडच्या भोवती स्प्रिंकलरने पाणी उडविण्याची सोय करावी. पाणी पिण्याची भांडी वाढवावीत. तसेच कोंबडीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार आणि खाद्य व्यवस्थापन करावे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*