झाम्बियाने उठविली जीएम आयातबंदी

जगातील वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी जीएम (जनेटिकली मॉडीफाईड) टेक्नॉलॉजी उपयोगी ठरणार असल्याचे मान्य करीत झाम्बिया या देशाने जीएम शेतमालावरील आयात-निर्यातबंदी उठविली आहे.

या देशाचे आरोग्य मंत्री डॉ. चीतालू चीलुफ्या यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, जीएम शेतमाल आणि त्यापासून बनविलेले अन्नपदार्थ मानवी किंवा कोणत्याही जीवाच्या आरोग्यास हानी पोहोचवीत नाहीत. वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या संशोधनातून हे अनुमान काढण्यात आलेले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इतरही संस्थांचा सल्ला आमच्या देशाने घेतला आहे. त्यानुसार आमच्याकडे लागू असलेली जीएम आयात-निर्यातबंदी उठविण्यात आलेली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*