कृषी उत्पन्नाचा दर नीचांकी पातळीवर

मुंबई :

शेतमालाच्या भावात अभूतपूर्व घट झाल्याने सध्या कृषी उत्पन्नाचा दर 1.1 टक्के कमी झाला आहे. मागील 11 तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ या कालावधीत हा दर नीचांकी नोंदविला गेला आहे.

लोकसभा निवडणुका जवळ येऊनही शेती हा विषय राजकीय अग्रक्रमावर आणण्यात शेतकरी संघटना अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळेच धर्म, आरक्षण आणि जातीय अस्मिता याच मुद्यावर यंदाच्या निवडणुका होत आहेत. यंदा दुष्कालाही भयाण आहे. अशावेळी त्याच्याच आधीच्या तिमाहीत कृषी उत्पन्नाचा नीचांक २००४ नंतर सर्वाधिक कमी नोंदविण्यात आलेला आहे. आता दुष्काळामुळे तर त्यात आणखी घट होण्याचा अंदाज आहे.

प्रमुख माध्यमांनी या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर याबद्दल माहिती देऊन हा विषय चर्चेत आणला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*