उन्हाळ्यात हायड्रोपोनिक्सचा आधार..!

यंदाच्या दुष्काळात जनावरांच्या चारा आणि पाण्याच्या समस्येवर पशुपालकांना विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण यंदा गोठ्यात असोत की छावणीत, जनावरांना फ़क़्त ऊस हा एकमेव चारा खावा लागण्याची शक्यता आहे. उसाचे दुष्परिणाम लक्षात घेता कमी पाणी व खर्चात निर्माण होणारा हायड्रोपोनिक्स चारा हा उत्तम पर्याय ठरेल.

पशुखाद्यावरील खर्च ४० टक्के कमी करण्यासह ९० टक्के पचणारा उत्तम चारा म्हणून हायड्रोपोनिक्स चाऱ्याला मोठी मागणी असते. काहीजण त्याचा व्यवसाय करीत आहेत. या चाऱ्यात जीवनसत्व, खनिजे यांचे प्रमाण चांगले असल्याने हे खाऊ घातलेल्या जनावरांची रोगप्रतिकार क्षमता वाढते. भाकड जनावरास 6 किलो आणि दुभत्या जनावरांना 15 किलोपर्यंत हा चारा देण्यास हरकत नाही. यामुळे दुधाचा स्निग्धांश आणि दुधाचे प्रमाणही वाढते. एक किलो गहू किंवा मक्यापासून ७ ते 8 दिवसांत 20 ते 25 सेमी वाढलेला दहा किलो चारा याद्वारे मिळतो.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*