त्या सोयाबीनलाही मिळणार २०० रुपये क्विंटल अनुदान

मुंबई :

आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसह खासगी बाजार समितीत विक्री केलेल्या सोयाबीनलाही २०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

याबद्दल माहिती देताना मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, खासगी मार्केट यार्डात विक्री केलेल्या सोयाबीन मालाला अनुदान मिळत नव्हते. त्याबद्दल हजारो शेतकरी बांधवांनी सरकारला विनंती केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रती शेतकरी २५ क्विंटलपर्यंत हे २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*