असे ताक पिल्याने होईल त्रास..!

शरीराच्या शुद्धीसह वजन कमी करणारे आणि शरीर व मनाला थंडावा देणारे ताक म्हणजे अनेकांचे आवडते पेय. मीठ टाकून खार ताक, साखर किंवा गुळ टाकून केलेले गोड ताक आणि काहीजणांना मसाला ताक आवडते. यंदाच्या उन्हाळ्यात आपणही ताक पिणार असाल. मात्र, आपल्यासाठी उपयोगी असणारे हेच ताक दुष्परिणाम करणारे ठरणार नाही याचीही आपण काळजी घ्याल अशीच अपेक्षा आहे.

उन्हाळ्यात आता जागोजागी शहर व गावातही ताकाचे ठेले सुरू होतील तिथले ताक पिण्याचे दुष्परिणाम आधीच समजून घ्यायला हवेत. घरी बनविलेले व माठ किंवा फ्रीजमध्ये थंड केलेले ताक नक्की वरदान अआहे. मात्र, रस्त्यावरील ठेले किंवा अगदी हॉटेलातही ताक देताना त्यात भरमसाठ बर्फ टाकला जातो. अनेकदा असा बर्फ बोअरिंग किंवा प्रसंगी सांडपाण्यावर तयार केलेलाही असू शकतो. तसेच ताक बनविताना व ग्राहकांना देताना त्यामध्ये कोणत्याही जीवाणूचा प्रादुर्भाव नाही अशाच ठिकाणचे ताक प्यावे. प्रसंगी ताकावाल्यास जास्तीचे पैसे द्यावे लागले तरीही चालतील मात्र, त्यात असा तयार बर्फ नसेल याची खात्री करून घ्या.

फ्रीजमध्ये थंड करून स्वच्छता राखून तयार केलेले कोणतेही ताक पिण्यास हरकत नाही. ते आरोग्यदायी असेल. मात्र, अस्वच्छता आणि खराब पाण्याच्या बर्फाचे ताक आपल्याला पोटाचे विकार आणि इतर आजारांची लागण होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तसेच उन्हातून आल्याबरोबर थंड ताक पिऊ नये. उन्हातून आल्यावर आधी थोडा आराम करून मग थोडे पाणी पिल्यावर ताक प्यावे. यामुळे उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*