स्ट्रोकपासून वाचवणारी आरोग्यदायी कैरी

उन्हाळा आला की द्राक्ष आणि नंतर वेध लागतात आंबे खाण्याचे. मात्र, दरम्यानच्या काळात असतो कैरीचा हंगाम. आंब्याला लगडलेल्या कैऱ्यांचे पाड होऊन पिकलेला आंबा खाण्यापुर्वीच आरोग्यदायी अशी कैरी आपल्याला उन्हाच्या कडाक्यात दिलासा देते.

उष्माघात अर्थात सन (हिट) स्ट्रोकपासून वाचवणारी ही कैरी नियमित खाल्ल्यास मोठा फायदा होतो. त्वचा तजेलदार आणि पचनशक्ती वाढविणाऱ्या कैरीमध्ये अनेक जीवनसत्व आणि खनिजे असतात.

जेवणासोबत कैरीच्या फोडी खाण्यासह रानात फिरतानाही आपण कैरी खाऊ शकतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कैरी खावी. उन्हात काम करतानाही याचा फायदा होतो. पचनशक्ती उत्तम राहण्यासह चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यासाठीही कैरी खावा. तसेच याचा शीतल रस चेहऱ्याला लावूनही फायदा होतो.

ता. क. कैरी गुणकारी असली तरीही ती झाडावरून तोडताना देठानजीकच्या चीकामुळे आपल्याला इजा होऊ शकते. कैरीचा हा चिक आपल्या त्वचेवर पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*