ढोबळी मिरचीचे भाव ३८ रु./किलो

मुंबई :

उन्हाळ्यामुळे काही पिकांचे भाव पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार रंगीत व हिरवी ढोबळी मिरचीचे भाव वाढले आहेत. आज कल्याण मार्केटला ढोबळीचे भाव ३५ ते ४० रुपये होते.

महाराष्ट्रात सर्वत्र सध्या ढोबळी मिरचीचे भाव वाढत आहेत. कल्याणमध्ये सरासरी ३८ रुपये किलो असा सर्वाधिक भाव मिळाला. तर, मुंबई मार्केटलाही ३० ते ४० रुपये दरम्यान भाव मिळून सरासरी ३५ रुपये होती. पुणे जिल्ह्यात मात्र, मुंबईच्या तुलनेत भाव कमी आहेत. पुण्यातील गुलटेकडी, मोशी व चाकण बाजार समितीत ढोबळीला २० ते ३० रुपये दरम्यान भाव मिळाला. पुण्यात सगळीकडे सरासरी भाव २४ रुपये किलो आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर बाजार समितीत लोकल ढोबळी मिरचीला १५ ते २० रुपये किलो भाव मिळाला. तर, काल पंढरपूर (जि. सोलापूर) बाजारात त्यास सर्वाधिक ५० रुपये किलो भाव मिळाला. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि इतर बाजार समितीत ढोबळीला २५ ते ३२ रुपये किलोचा भाव मिळत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*