महिन्यात वांग्याचे भाव ५० % घसरले

पुणे :

मागील महिन्यात ४० ते ५० रुपये किलोवर असलेले वांगे आता निम्म्याने कमी होऊन सरासरी १८ ते २२ रुपयांवर स्थिरावले आहेत. वाढत्या उन्हाबरोबरच वांग्याचे भाव कोसळल्याने उत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. राज्यभरात असेच चित्र आहे.

आता लग्नसराई सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात वांग्याचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आजचे बाजार समितीमधील वांग्याचे भाव पुढीलप्रमाणे (कंसात सरासरी प्रतिकिलो भाव ) : अकलूज १५-२५ (२०), खेड-चाकण १५-२५ (२०), श्रीरामपूर २०-३० (२५), विटा-सांगली १५-१८ (१६), मंगळवेढा १०-२२ (१३), पुणे-गुलटेकडी १५-२५ (१७), पिंपरी २०-३० (२५), मोशी १०-१५ (१२), मुंबई १०-२२ (१६), वडगाव-पेठ १०-२५ (१८), रत्नागिरी २०-३- (२६) आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*