कांदा अनुदानास मुदतवाढ

मुंबई :

भाव कोसळल्याने संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेसाठी पात्रता निकष म्हणून २८ फेब्रुवारी २०१९ ही तारीख वाढविण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. खरीप किंवा रब्बी हंगामातील कांदा २८ फेब्रुवारी पूर्वी बाजार समितीत आणून विकलेल्या सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी संबंधित बाजार समितीत संपर्क साधण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*