दुधाच्या अनुदानाचा मार्ग मोकळा

मुंबई :

दुधाचे भाव उत्पादन-खर्चाच्या तुलनेत पडल्याने दुग्धोत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा कोणालाही फटका बसून मतदारांची नाराजी वाढू नये यासाठी राज्य मंत्रिमंडळाने दुधाच्या भुकटीसाठीचे ३ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याची मुदत ३० एप्रिल २०१९ पर्यत वाढविली आहे.

भुकटी व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुदान देण्याची योजना पूर्वलक्षी प्रभावाने 30 एप्रिल 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. या निर्णयान्वये राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित 3.2/8.3 (गाय दूध) आणि त्यापेक्षा अधिक गुणप्रतीच्या दुधासाठी अनुदान देण्यात येत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातही दूध भुकटी उत्पादनात वाढ होऊन आपल्याकडील दुधाचा काहीअंशी वापर दूध भुकटी करण्यासाठी होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*