दुधवाल्यांसाठी मुदतीने आनंदाची बातमी

मुंबई :

मध्येच खंड पडलेले दुध भुकटी बनविण्याचे प्रतिलिटर ३ रुपये अनुदान पुन्हा सुरु करण्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाने केली आहे. आता ३० एप्रिलपर्यंत हे अनुदान नियमित दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना खुश करण्यासाठी विशेष ३८ शासन निर्णयांचा फडशा पडला आहे. त्यातील एक म्हणजे दुध भुकटी अनुदान याच सरकारने ३ वर्षांपूर्वी दुध भुकटी अनुदान बंद करून दुधाचा प्रश्न निर्माण केला. त्यानंतर लोकांचे होणारे हाल आणि मागणी याचा विचार करून हे अनुदान पुन्हा सुरु केले आहे. मात्र, तेही नियमित न ठेवता त्याला मुदत टाकून दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या गळ्याला कायमचा फास ठेवला आहे. त्यामुळेच ही आनंदाची बातमीही मुदतीसाठीच आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*