बँकेची नोकरी सोडून शेतीत फुलविली लालचुटुक स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्यासमोर पहिल्यांदा येतो तो महाबळेश्वर (जि. सातारा, महाराष्ट्र) आणि तेथील चाल्चुतुक हिरव्या देठाचे फळ. देशभरात महाबळेश्वराच्या स्ट्रॉबेरीला विशेष मागणी आहे. मात्र, आता महाराष्ट्रासह इतरही काही राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हे फळ पिकवून तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत क्रांती केली आहे. त्यापैकीच एक प्रयोगशील शेतकरी म्हणजे इंदोर (मध्यप्रदेश) येथील सुरेश शर्मा. प्रतिवर्षी २० लाख रुपये पगार असणारी बँकेची नोकरी सोडून शर्मा यांनी इंदोरकरांना स्ट्रॉबेरी फळ खाऊ घालण्याच्या कामात झोकून देत यशस्वी शेती केली आहे.

शर्मा एकदा महाबळेश्वरला कुटुंबासमवेत फिरायला आल्यावर त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना भेटून स्ट्रॉबेरी शेतीबद्दल माहिती घेतली. या लालचुटुक आणि आंबट-गोड फळाला आपल्याकडे मोठी मागणी असते. तर, आपणच इंदोरमध्ये याचे उत्पादन करून का नाही विकू शकत, हा विचार शर्मा यांच्या मनाने घेतला आणि मग वाटचाल सुरू झाली यशस्वी स्ट्रॉबेरी शेतीची.

त्यांच्याकडे गहू, हरभरा आणि सोयाबीन हे प्रमुख पिक आहे. त्यांनी शेती करण्यासाठी बँकेची नोकरी सोडून देत जमविलेल्या पैशांतून २ एकर शेती खरेदी केली. त्यानंतर सावरे बायपास भागातील या शेतीत त्यांनी महाबळेश्वर येथून आणलेले ५० रोपे लागवड करून प्रयोग केले. त्यातून मिळालेले अनुभव आणि शिक्षण त्यांना पुढील शेतीसाठी कामी आले. स्थानिक बाजारात सध्या त्यांची
स्ट्रॉबेरी विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू बनली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*