उद्या बीव्हीजी फाउंडेशनतर्फे डाळिंब उत्पादक मेळावा

केडगाव चौफुला येथे १८ मार्चला कार्यक्रम; चेअरमन हणमंतराव गायकवाड करणार मार्गदर्शन

पुणे :
दौंड (जि.पुणे) तालुक्यातील केडगाव चौफुला येथील नवले लॉन्स येथे सोमवारी (१८ मार्च) बीव्हीजी फाउंडेशनच्या वतीने राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा व प्रशिक्षण शिबीराचे करण्यात आले आहे.
यावेळी चेअरमन हणमंतराव गायकवाड आणि डाळिंब विषयातील तज्ज्ञ उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यभरातून या मेळाव्यास डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहेत. के. डी. चौधरी ग्रुपचे संचालक प्रसिद्ध डाळिंब व्यापारी तानाजी चौधरी, डाळिंब रत्न बाबासाहेब गोरे हे यावेळी शाश्वत डाळिंब शेती व विषमुक्त डाळिंब व्यवस्थापन आणि निर्यात संधी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. त्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन बीव्हीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रविराज म्हस्के (मो. 9823525450) व प्रदिप शिंदे (मो. 9604288686) यांच्याकडे संपर्क साधावा.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*