Blog | सावली कोणाला सापडली..?

झाडांची सावली हरवली, ती कोणाला सापडली.., असेच म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण दुष्काळी परिस्थितीत सध्या सावली म्हणजे दुर्मिळ वस्तू बनली आहे.

दुष्काळी परिस्थितीत सरकारने जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. त्यातही छावणीची जबाबदारी कोण घेणार? पैसे कोण लावणार ईथपासुन बर्याच प्रश्नांना तोंड देत छावण्या कशाबशा सुरू झाल्या. तरीही छावण्यामधे गाय,म्हैस अशा मोठ्या जनावरांची व्यवस्था केली परंतु शेळ्या, मेंढ्यांसारख्या छोट्या जनावरांचे काय? त्यांच्या चार्याचा प्रश्न कसा सुटणार?
हे प्रश्न असताना छोट्या जनावरांची कडुनिंबासारख्या झाडांची फांद्या तोडून भूक भागवली जात आहे. सतत फांद्या तोडल्या जात आहेत. अशा झाडांची तोंड होतं आहे जी औषधी आहेत आणि सावली देतात. खरंतर झाडांना फक्त खोड शिल्लक राहिलं आहे. ग्रामीण भागात सावली हरवत चालली आहे. या सगळ्यात दोषी शेतकरी नक्कीच नाही कारण त्यांच्याकडे पर्याय नाही. छोट्या जनावरांसाठी कुठलीही ऊपाययोजना नाही.

लेखक : विनोद सूर्यवंशी, अहमदनगर

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*