विषमुक्त शेती, हीच काळाची गरज : हणमंतराव गायकवाड

पुणे :

निरोगी भारतासाठी विषमुक्त विषमुक्त शेतमाल उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन बीव्हीजी समुहाचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी केले.

विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन दुपटीने घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची आपली तयारी आहे असे देखील ते म्हणाले. बीव्हीजी लाईफ सायन्सेस व के.डी. चौधरी समुहाच्या वतीने दौंड (जि. पुणे) तालुक्यातील केडगाव चौफुला येथे आयोजित करण्यात आलेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात गायकवाड बोलत होते. यावेळी चौधरी उद्योग समुहाचे के. डी चौधरी, तानाजी चौधरी, वैशाली गायकवाड, डाळिंब तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब गोरे उपस्थित होते.

भारत विकास प्रतिष्ठानच्या वतीने शेतकऱ्यांना विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करून सेंद्रीय शेती करण्यासाठी उपकृत करण्यात येत आहे असे हणमंत गायकवाड म्हणाले. शिरोळ येथे ३१ हजार लोकांना कॅन्सर झाला आहे विषारी अन्न खाल्ल्याने कॅन्सरचे प्रमाण वाढले असल्याचे श्री. गायकवाड म्हणाले .

विषमुक्त शेतीची चळवळ उभारून उत्पादनांत वाढ होईल यासाठी खते व औषधे निर्माण करण्य़ासाठी बीव्हीजी लाईफ सायंन्सेसने पुढाकार घेतला आहे. डाळिंब उत्पादनात देखील तो प्रयोग सुरू केल्याचे हणमंत गायकवाड म्हणाले. विषमुक्त शेतीचा खर्च कमी करून उत्पादन दुप्पट करण्याच्या चळवळीत शेतकऱ्यांनी सामील व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

माती व पाणी परिक्षण शेतीसाठी उपयुक्त असते ते शेतकरयांनी प्राधान्याने करून घेतले पाहिजे तरच शेतीला कोणते पोषक द्रव्ये दिली तर उत्पादन वाढेल हे कळेल. के. डी उद्योग समुहाच्या माध्यमातून भारत विकास प्रतिष्ठान याला प्राधान्य देईल असे हणमंत गायकवाड म्हणाले .

डाळिंबाच्या प्रती झाडाला सरासरी पेक्षा अधिक उत्पादन मिळायला हवे असे सांगून डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद आमच्या संशोधनात आहे असे श्री. गायकवाड म्हणाले. डाळिंब उत्पादनात वाढ व क्वॉलिटी राखण्याचे मार्गदर्शन आमची संस्था करेल असेही ते म्हणाले रासायनिक खते व किटकनाशक टाळून सेंद्रिय उत्पादनांना प्राधान्य दिले जावे असे हनुमंत गायकवाड म्हणाले भारत विकास संस्थेच्या माध्यमातून हेल्थ केअर सेंटर उभारले आहे तसेच कॅन्सरवर औषध देखील निर्माण केल्याचे सांगून मोतीबिंदू ऑपरेशनशिवाय चांगला करण्याचे औषध तयार होत असल्याचे देखील श्री. गायकवाड म्हणाले .

स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून स्वप्न साकारण्यासाठी परिवर्तनवादी चळवळ निर्माण करून जनतेला विषमुक्त अन्न देण्यासाठी प्रयत्न करू तसेच विषमुक्त फळे व अन्य अन्न उत्पादित मालाला मार्केट मिळवून देण्याचे देखील श्री. गायकवाड यांनी सांगितले .

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*