यंदा होणार विक्रमी निर्यात; युरोपातून जोरात मागणी

नाशिक :

उन्हाळ्यात पाणीदार दिसला देणाऱ्या भारतीय द्राक्षाला सध्या युरोपसह जगभरातून जोरदार मागणी आहे. मागणी व पुरवठ्याचे गणित लक्षात घेता यंदा द्राक्ष निर्यात 2 लाख मेट्रिक टनांचा टप्पा सहजपणे पार करण्याचा अंदाज निर्यातदारांना वाटत आहे. हा द्राक्ष निर्यातीचा विक्रम असेल.

पोषक हवामानामुळे व अवकाळी पावसाने विशेष झटका न दिल्याने यंदा नाशिकसह सांगली व पुणे जिल्ह्यात दर्जेदार द्राक्षघडांचे उत्पादन मिळत आहे. त्यास निर्यातीला मोठी मागणी आहे. आतापर्यत युरोपात 97 हजार, तर इतर देशांत 27 हजार 400 मेट्रिक टन निर्यात झालेली आहे. निर्यातक्षम थोमसन सीडलेस जातीला सध्या 35 ते 55 रुपये किलो भाव मिळत आहे. पुढील पंधरा दिवस किमान निर्यातीचा हंगाम जोरात असेल. या कालावधीत बाहेरील देशांतून असणारी मागणी लक्षात घेता सहजपणे 2 लाख टन निर्यातीचा टप्पा सध्या होण्याची शक्यता आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*