युरोपातून मागणीमुळे रु.55/किलोपर्यंत भाव

मुंबई :

रशियासह युरोपातून भारतीय द्राक्षाला मागणी वाढल्याने सध्या निर्यातक्षम द्राक्षाला 55 रुपये प्रतीकिलोपर्यंत भाव मिळत आहेत. रेसिड्यू फ्री द्राक्षांना युरोपात मोठी मागणी आहे. त्या द्राक्षाला सर्वाधिक भाव मिळत आहेत.

भारतातून सध्या युरोपातील नेदरलँड, जर्मनी, इंग्लड, डेन्मार्क, फिनलंड, लॅटिव्हिया, फ्रान्स, नाॅर्वे, बेल्जियम, लुथियाना, स्वीडन, स्वीत्झर्लंड, आयर्लंड, स्पेन, पोर्तुगाल, आॅस्ट्रिया, इटली, रोमानिया, झेक रिपब्लिक, ग्रीक, पोलंड या देशांसह रशिया, इराण, माली, ब्रुनेई, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, जाँर्डन, सिंगापूर, नेपाळ, बांगलादेश, युक्रेन, चीन, कॅनडा या देशांमध्येही मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात होत आहे. या मालास सध्या 35 ते 55 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहेत.

यंदा माल चांगला असल्याने मागणीही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच द्राक्ष निर्यातीचा 2 लाख टन हा टप्पा यंदा भारतीय द्राक्ष निर्यातदार पूर्ण करण्याची शक्यता निर्यातदार संघटनेला वाटत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*