भाजपच्या वाघांचा डीएनए पाकिस्तानी : बच्चू कडू

मुंबई :

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना लावारिस म्हणून हिणवत लाज काढणाऱ्या भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. त्यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही त्यांना लक्ष्य केले आहे.

कडू यांनी म्हटले आहे की, वाघ यांचा डीएनए पाकिस्तानी असणार. तो तपासून पाहायला पाहिजे. शेतकऱ्यांची वेदना भाजपला समजत नाही. लोकसभा निवडणूक झाली की प्रहार संघटना वाघ यांना जाब विचारून कानशिलात लगावणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*