वादळी पावसाने सोलापूर, सांगलीसह मराठवाड्यात मोठे नुकसान

पुणे :

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंबासह उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाच काही ठिकाणी कमी पाण्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिके फुलविले आहेत. मात्र, त्यावर वादळी पावसाने झडप घालून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव व मिरज भागात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. तर, सोलापुरात अनेक ठिकाणी द्राक्ष बागा या पावसात भुईसपाट झाल्या आहेत. नांदेड भागातही पाऊस झाल्याच्या बातम्या आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*