Bad News | यंदाही दुष्काळ; स्कायमेटचा अंदाज

पुणे :

अल निनो आणि ला निनो यांच्या झटक्याचे दुष्परिणाम यंदा मान्सूनवर दिसणार असल्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच आता स्कायमेट या जगप्रसिद्ध संस्थेने यंदा देशात सरासरीच्या तुलनेत 93 टक्केच पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतासह दक्षिण आशिया व ऑस्ट्रेलियन भागात यंदा अल निनोमुळे दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदा भारतात दुष्काळ पडण्याची स्थिती 55 टक्क्यांपर्यंत जास्त आहे. सलग दुसऱ्या वर्षी असा दुष्काळ पडल्यास देशापुढील संकट आणखी गंभीर होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*