बिसलरीच्या पाण्यापेक्षा दुध स्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त

पुणे :

दुधाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. अनुदानही मिळत नाही. पण एक लीटर दुध हे अर्धा लीटर पाण्याच्या भावाने विकले जात आहे. माढा तालुक्यातून दररोज जवळपास 60 हजार लीटर दूध संकलीत होते. तालुक्यात फक्त 18 ते 20 रूपये लीटरने दूध विकले जात आहे. त्यातही शेतकर्यांना अनुदान मिळत नाही. आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना असा परिस्थिती शेतकर्यांची झाली आहे.
दुष्काळी परिस्थिती असल्याने वैरणीचे भाव वाढले आहेत.

एका जनावराला एका दिवसाला कडब्याच्या 11 पेंड्या दिल्यास 310 रुपये मोजावे लागतात. त्यातून जास्तीतजास्त 9 लिटर दूध मिळू शकते. याचाच अर्थ दुधाचे त्या शेतकऱ्याला 20 रुपये प्रमाणे 180 रुपये मिळतात. म्हणजे प्रत्यक्षात वैरणीचा खर्च 300 रुपये होतोय आणि त्यात पोषण आहाराचे 100 रुपये होतात. यानुसार शेतकऱ्याला दिवसामागे 220 रुपये तोटा होत आहे.
आता या परिस्थितीत शेतकरी हताश आहेत. आंदोलने करून झाली तरीही अनुदान मिळाले नाही. महागाई दिवसेंदिवस वाढती आहे. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाची अवस्था दयनीय आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*