IMP | कोंबड्यांच्या बाजारभावात अन् उत्पादन खर्चातही उच्चांक

पुणे :

महाराष्ट्र राज्यासह देशातील ब्रॉयलर उद्योगाने चालू आर्थिक वर्षांतील पहिल्याच तिमाहीत तीन गोष्टीत उच्चांक साधला आहे. या काळात कमालीच्या प्रतिकूल हवामानामुळे आजवरचा सर्वाधिक मरतुकीचा दर नोंदविला गेला आहे. राज्यात मक्याचे भाव 2400-2500 रुपये प्रतिक्विंटल या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत, एप्रिलमध्ये प्रथमच ब्रॉयलर कोंबड्यांचा प्रतिकिलो लिफ्टिंग दर शंभरीपार गेला आहे.

नॉन ब्रीडर्स इंटिग्रेटर्सना या कच्चा मालाच्या भाववाढीची सर्वाधिक झळ बसली आहे. पिल्लांमुळे त्यांची खर्च 5-6 रुपये अधिक झाला आहे. मार्केटचे दर सुधारल्यामुळे त्यात थोडी भरपाई होण्याची शक्यता वाटत होती, मात्र उन्हाळ्यातील मरतुकीमुळे बॅलन्सशीटला झटका बसला आहे. मात्र, त्यात सुधारणा होऊन कुक्कुटपालन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्याचा अंदाज शेती विषयाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*