Blog | ब्रॉयलर पोल्ट्री काही निरीक्षणे

यंदा प्रथमच एप्रिल महिन्यात 100 रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिकचा लिफ्टिंग दर ब्रॉयलर पोल्ट्री व्यावसायिकांना मिळत आहे. त्यामुळे बाजारात असलेल्या तेजीबद्दल काही निरीक्षणे औरंगाबादस्थित खडकेश्वर हॅचरिजचे डीजीएम (मार्केटिंग) जयदीप कुमारिया यांनी नोंदविली आहेत.

कुमारिया यांची निरीक्षणे पुढीलप्रमाणे :
1. सध्या ब्रॉयलरचा बाजार तेजीचा कल दाखवत आहे. मोठ्या पक्ष्यांना जोरदार मागणी आहे. उपवासाचे सण-उत्सव संपल्यानंतर आता रिटेल-घरगूती मागणीत वाढ झाली आहे. रिटेल बोर्ड रेटवर त्याचा परिणाम दिसत आहे.
2. सध्या पिल्लांचा तुटवडा आहे. तसेच यापुढेही ही मागणी आणखी वाढेल. उत्तर व दक्षिण भारतातील मार्केट्समध्ये त्यात आणखी सुधारणा अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुका आणि रमजान महिन्यामुळे ही मागणी उंचावत जाईल.
3. पॅन इंडिया बेसिसवर ब्रॉयलरचे लिफ्टिंग रेट्स 94-99 रुपये प्रतिकिलो दरम्यान राहतील. तापमानावाढीमुळे वाढलेली मरतुक आणि कच्च्या मालाची उच्चांकी वाढ यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. मात्र, भाववाढीमुळे उत्पादकांची चिंता कमी झाली आहे.
4. ओपन फार्मर्स व इंटिग्रेटर्सनी दोन किलो वजनाच्या आत अशीच सातत्यपूर्ण विक्री केली तर लिफ्टिंग रेट यापुढेही किफायती ठरेल.

लेखन व संकलन : विनोद चव्हाण (कुक्कुटपालन विषयाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*