राजकीय नव्हे तर उन्हाचा ताप..!

पुणे :

देशभरात लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप करून राजकीय वातावरण तापविण्याकडे राजकीय पक्षाचे धुरीण लक्ष देत आहेत. मूळ प्रश्नाला बगल देऊन निरर्थक आणि तुलनेने किरकोळ अशा मुद्यांवर ही निवडणूक तापली आहे. त्याचवेळी देशासह महाराष्ट्र राज्यात उन्हाचा तापही तितकाच वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे.

देशात उद्या एकूण सातपैकी चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडणार अआहे. राज्यात पुणे, मुंबई, खानदेश या पट्ट्यातील एकूण १७ जागांसाठी मतदान होईल. अशावेळी तापमानाचा पाराही ४५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झालेला आहे. मतदार आणि जनता निवडणूक आणि उन्हाची काहिली या दोन्हीवर एकाचवेळी चर्चा करीत आहेत.

खानदेशातील नंदुरबार आणि जळगावात रावेर येथे तापमानाने अनुक्रमे ४६.१ व ४८ अंश अशी नोंद केली आहे. उन्हामुळे उष्माघात होऊन आतापर्यत किमान दहा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा वातावरणात जनता कितपत मतदान करणार आणि कोणाला कौल देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*