तापमानवाढीमुळे अवकाळीवर परिणाम; २७ % फटका

पुणे :

जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम याबद्दल सातत्याने बोलले जात आहे. मात्र, तरीही त्या महत्वाच्या मुद्याकडे जगाचे विशेष लक्ष नाही. त्याचाच फटका भारतीय शेतकऱ्यांना बसला असल्याची महत्वपूर्ण आकडेवारी भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

पूर्वमोसमी अर्थात अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाळ्यातील पिके बहरतात आणि उन्हाचा कडाकाही बऱ्याच अंशी कमी होतो. अनेकदा यामुळे आर्थिक व राजकीय क्षेत्रालाही धक्का किंवा दिलासा मिळतो. यंदाच्या वाढत्या तापमानामुळे पूर्वमोसमी पावसात सुमारे २७ टक्के घट झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात ही घट नोंदविली गेली आहे.

उन्हाळी पिके बहरण्यास आणि वाढत्या पाणीटंचाई व उकाड्याला अवकाळी पाऊस झटका देतो. त्याने काही ठिकाणी फळबागांचे नुकसान होते. मात्र, तरीही एकूण शेती व अर्थकारण यासाठी आणि दक्षिण आशियाई देशातील पर्यावरणावरील दुष्परिणाम रोखण्यासाठी अवकाळी पाऊस महत्वाचा असतो. हा पाऊस कमी झाल्याचे दुष्परिणाम पुढेही दिसण्याची भीती हवामानाचे अभ्यासक व्यक्त करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*