त्यांना मतदान संपल्यावर आठवला दुष्काळ..!

पुणे :

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेती, पाणी, दुष्काळ, रोजगार, आरोग्य सेवा अशा मुद्यांना कमी महत्वाचे लेखून राष्ट्रवाद, हिंदुत्व, धर्म आणि पाकिस्तान यांच्या मुद्यांवर बोलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता मतदान प्रक्रिया पार पडल्यावर राज्यातील दुष्काळ आठवला आहे. तर, प्रचारात व्यस्त असताना वेळ न मिळू शकलेल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना आता छावण्यांच्या भेटीचे वेध लागले आहेत. मतदान संपल्यावर अशा ‘कमी महत्वाच्या मुद्यां’ची राजकीय पक्ष व नेत्यांना आठवण होतेच कशी असा प्रश्न जनतेला पडला आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली की ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी छावण्यांमधील शेतकऱ्यांची भेट गरजेची असल्याचे सांगत तसे दौरे सुरू केले आहेत. तर, विरोधकांना तुरुंगात टाकण्याच्या पंचवार्षिक फिव्हरमधून आणि धार्मिक राष्ट्रवादाचे गोडवे गाण्यातून वेळ मिळाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळ हा मुद्दा पुन्हा एकदा हाती घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि शिवसेना यांनी विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला तुरुंगाच्या दारात नेऊन ठेवले. आता त्यावर काय कार्यवाही होणार की फुकाच्या बाता ठरणार हे पुढच्या महिन्यात समजेल. मात्र, त्याचवेळी आपले राज्यातील प्रश्नांकडे लक्ष असल्याचे भासविताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला साकडे घातले आहे. दुष्काळामुळे आचारसंहिता शिथिल करण्याची त्यांची मागणी आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*