असा टाळा उन्हाच्या काहिलीत उष्माघात..!

सध्या देशभरात उष्णतेची लाट आलेली आहे. महाराष्ट्र असोत की आंध्रप्रदेश ते थेट राजधानी दिल्ली व पानिपत, या सगळ्या भागातील जनता उन्हाच्या काहिलीने हैराण झालेली आहे. अशावेळी उष्माघात आणि त्यामुळे आजारी पडण्यासह काही ठिकाणी थेट मृत्यू होण्याचीही शक्यता वाढते. त्यामुळेच उष्माघात टाळण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागते.

वातावरणातील तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा जास्त गेल्यास मानवी शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. मानवाच्या शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस ठेवण्यासाठी अशावेळी पाणी महत्वाची भूमिका बजावते. तसेच इतर काही काळजी घेऊन आपण उष्माघातापासून वाचू शकतो. त्याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे :

१. शेतात काम करताना, दुचाकीवर प्रवास करताना किंवा उन्हात फिरताना डोक्यावर टोपी किंवा काहीतरी घालावे. तसेच नियमितपणे व गरजेनुसार पाणी पीत राहावे. अतिथंड पाणी टाळावे. बर्फाच्या पदार्थांना उन्हातून लगेच आल्यावर खाऊ नये.

२. दही, टाक, लस्सी, लिंबूरस, कोकम सरबत किंवा इतर कोणतेही सरबत प्यावे. उन्हातून सावलीत आल्यावर लगेच पाणी किंवा सरबत पिऊ नये. उन्हातून आल्यास १०-१५ मिनिटे आराम करून गुळ-पाणी पिल्यास शरीराला दिलासा मिळतो.

३. उन्हात प्रवास व काम करणे टाळावे. सकाळी किंवा संध्याकाळी उन्हे उतरल्यावरच काम करण्यास सुरुवात करावी. शेतातील फवारणी व इतर कामे रात्री केल्यास उत्तम. तसेच आहारात द्रवरूप पदार्थ घ्यावेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*