#महाराष्ट्र दिन | दुष्काळ व बेरोजगारी विसरू नका : ठाकरे

मुंबई :

महाराष्ट्र दिनासह जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळ व बेरोजगारी या मुद्द्यांचा विसर पडू न देण्याचे ट्विट केले आहे.

ट्विटरवर १ मे दिनानिमित्त त्यांनी विशेष पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात राज्यातील दुष्काळ आणि तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. सर्व क्षेत्रात आपला दबदबा व लौकिक महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने कायम राखला आहे. मात्र, हाच लौकिक टिकविण्यासाठी सध्या राज्याला झोकून देऊन काम करण्याची गरज त्यांनी या पत्रकात व्यक्त केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*