लिंबू पाणी प्या, चैतन्यदायी रहा..

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचा सल्ला कोणीही भेटला की देतोच. अनेकांना ते प्यायला गोड व सुमधुर असल्याने प्यावेसेही वाटते. किंवा काहींना त्याचे आरोग्यादायी फायदे माहित असल्याने इतरांना ते मिळावेत यासाठी काहीजण लिंबू पाणी अर्थात सरबत पिण्याबद्दल जागृती करित असतात. आपणही जाणून घ्या सरबताचे फायदे…

लिंबू फळामध्ये क जीवनसत्व आणि इतरही काही प्रमुख आरोग्यदायी घटक असतात. सरबत पिल्याने ते शरीराला मिळतात. तसेच सरबतामुळे शरीराला थंडावा मिळून मन चैतन्यदायी होते.

पोटामध्ये अॅसिडिटी असल्याने आपल्याला बैचेन होते. तसेच उन्हाळ्यात अनेकांना पोटात गरम होऊन त्रास होतो. अशा मंडळींनी सुमधुर लिंबू पाणी नियमित प्यावे.

पचनशक्ती सुधारण्यासह त्वचेचा तजेला वाढविण्याचे काम लिंबू सेवनामुळे होते. मात्र, थेट लिंबू खाल्ल्याने दातावरील पांढरे कवच खराब होत असल्याने लिंबू पाणी किंवा लोणचे यातून लिंबाचे सेवन करावे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*