IMP NEWS | शुक्रवारी होत आहे शेतकरी स्वावलंबन कार्यशाळा; बना इनोव्हेटिव्ह फार्मर

अहमदनगर :
शेतीचा उत्पादन-खर्च कमी करून अधिकचे उत्पादन घेतानाच योग्य बाजारपेठ मिळणेही तितकेच गरजेचे आहे. याचेच शास्त्रीय गुपित समजून घेण्याची संधी कृषी संशोधक डॉ. प्रफुल्ल गाडगे यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी (दि. 10 मे) सकाळी 8.30 ते सायंकाळी 4 या कालावधीत नगरमध्ये ही वैशिष्ट्यपूर्ण आणि शेतीक्षेत्राला नवी दिशा देणारी कार्यशाळा होत आहे.

याबद्दल माहिती देताना डॉ. गाडगे यांनी सांगितले की, कमीत कमी खर्चात योग्य प्रमाणात उत्पादन घेणे, शेतीमालाचा उत्कृष्ट असा निर्यातक्षम दर्जा कसा राखावा, सेंद्रिय शेती, रेसिड्यू फ्री आणि निर्यातक्षम शेती उत्पादन कसे करावे, शेतीसाठी घरच्या घरी औषध कसे बनवावे, टॉनिक (कांदा, डाळिंब, भाजीपाला, कापूस, सोयाबेन, टोमॅटो, मका आदी), ह्युमिक अमिनो, सेंद्रिय खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, ग्रोथ हार्मोन्स, दशपर्णी अर्क बनविण्यासाठी किंवा निर्मितीसाठी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाईल.

दुष्काळी फळबाग व्यवस्थापन, सनबर्न, डाळिंबावरील तेल्या, हुमणी तसेच नेमाटोड यांचे पूर्ण व्यवस्थापन, हमीभाव आणि करार शेती व्यवस्थापन याबाबतीत मार्गदर्शन केले जाईल असेही डॉ. गाडगे यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे अभ्यास सहल आणि शास्रज्ञाकडून बहुमूल्य असे मार्गदर्शन करण्यासह सर्व नोट्स पुरविल्या जातील. चहा-नाष्टा, जेवण आणि राहुरी कृषी विद्यापीठ अभ्यास सहल हे सर्व कार्यशाळा नोंदणी फी (रुपये 2000/-) मध्ये समाविष्ट आहे.

प्रशिक्षक यांच्याबद्दल थोडक्यात :
डॉ. प्रफुल्ल गाडगे
M.Sc. PhD. (Biochemistry )
Suporter member for
IFOAM Organics International
(डॉक्टरेट आणि कृषीक्षेत्रातील १३ वर्षांचा संशोधन आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचा अनुभव, आतापर्यंत २५पेक्षा जास्त उत्पादनांची निर्मिती, २२पेक्षा जास्त कंपन्यांना मार्गदर्शन)

कार्यशाळा नोंदणीसाठी संपर्क :
संदीप देशमुख
(मो. 9823981942, 8378878870) *मर्यादित जागा

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*