सांगा शेती करू कशी; ‘रॅपबाॅस’चा व्यवस्थेला सवाल..!

आपले विचार व्यक्त करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर होतो. दहा वर्षांपूर्वी व्यक्त होण्याच्या मर्यादा होत्या. मात्र, इंटरनेट आणि त्याच्या पाठोपाठ आलेल्या सोशल मिडीयाने ग्रामीण आणि अगदी वंचित समाजालाही व्यक्त होण्याची संधी दिली आहे. अनेकांनी याचा वापर करून व्यवस्थेला सवाल केले आहेत. त्यात भर पडली आहे ‘रॅपबाॅस’ची. होय, त्यांनी रॉक म्युझिकल अंदाजात ‘सांगा शेती करू कशी’, असाच प्रश्न उपस्थित करून देत सोशल मिडीयावर धमाल उडवून दिली आहे.

सध्या सोशल मिडीयावर ‘सांगा शेती करू कशी, पोटाची खळगी भरू कशी..?’ हा व्हिडीओ जोरात ट्रेंडमध्ये आहे. ‘रॅपबाॅस’ नावाच्या ग्रुपचा हा व्हिडीओ आहे. युट्युबवर चेतन गरुड प्रोडक्शनच्या या रॅप सॉंगला मराठी रसिकांची जोरदार दाद मिळत आहे. दिग्दर्शक अक्षय शिंदे यांच्या टीमच्या या गाण्याने शेतकऱ्यांचा प्रश्न नेमकेपणाने मांडला आहे.

अक्षय व चेतन यांच्यासह कमलेश शिंदे, गोपाळ शिंदे, प्रवीण थोरात, राहुल शेळके, नवनाथ बनसोडे यांच्या टीमने हा व्यवस्थेला थेट सवाल करणारा व्हिडीओ बनविला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*