दुष्काळी तक्रारीसाठी सरकारी व्हाट्सएप नंबर..!

औरंगाबाद :

दुष्काळी उपाययोजना राबविण्यात प्रशासनाने काही ठिकाणी अडचणी केलेल्या आहेत. त्याच्याविरोधात थेट तक्रार करण्याची सोय राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल करून मराठवाड्यातील दुष्काळी उपाययोजना आणि स्थिती याचा आढावा घेतला. त्यात त्यांनी 8879734045 हा विशेष नंबर जाहीर केला. यावर केलेल्या तक्रारींचे 48 तासात निराकरण केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. कोणीही सामान्य माणूस यावर तक्रार देऊ शकते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*