शाश्वत ग्रामविकासावर चंद्रकांत दळवी यांचे व्याख्यान

पुणे :

ग्रामीण विकासामधील गाव हा महत्वाचा घटक. याच गावाच्या उन्नतीतून शाश्वत ग्रामविकास घडविण्यासाठीचे काम माजी विभागीय आयुक्त व प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत दळवी करीत आहेत. त्यांच्या याच प्रयोगाबद्दल शुक्रवारी (दि. 10 मे 2019) पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथील कार्यक्रमात ते मार्गदर्शन करणार आहेत.

पुण्यातील वसंत व्याख्यानमालामध्ये शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता दळवी यांचे व्याख्यान होणार आहे. त्यांच्या निढळ (ता. खटाव, जि. सातारा) येथील 35 वर्षांच्या गावाच्या विकासाच्या प्रयोगांची माहिती ऐकण्याची संधी यामध्ये उपस्थितांना उपलब्ध होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*