तिकडे निवडणुकीतही शेतीप्रश्न होता अग्रक्रमावर; भारतात सोयीस्कर दुर्लक्ष

अमेरिकन शेतीप्रश्नांवर हिलरी क्लिटंन यांची सरसी तत्कालीन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतली होती. मात्र, शेतीप्रश्न आणि जागतिकीकरणाच्या मुद्यावर लढणाऱ्या हिलरी यांच्याऐवजी अमेरिकन जनतेने देशीवाद आणि अतिराष्ट्रवाद यांना महत्व देत ट्रम्प यांना संधी दिली होती. विकसित देशात शेती हा निवडणुकीचा मुद्दा झाला होता. मात्र, आपल्याकडे यावरून ही लोकसभा निवडणूक बाजूला नेत उजवा राष्ट्रवाद यावर केंद्रित झाली आहे हे दुर्दैव…

अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्रध्यक्ष पदांच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रॅम्प व हिलरी क्लिटंन राष्ट्रध्यक्ष पदाचे नियोजीत उमेदवार होते. दोनही उमेदवारांनी अमेरिकन शेती, वंशद्वेश व दहशतवाद आदी विषयांवर वाद, विवाद केला. शेती विषयक करार विषयावर विवाद करताना, क्लिटंन यांनी ट्रम्प यांना विविध मुद्द्यांवर घेरले होते. ट्रम्प यांनी बचावात्मक पवित्रा घेत, इतर अनेक विषयांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. शेतमालाची जागतिक विक्री करण्याच्या अनेक मुद्दयांना हिलरी यांनी स्पर्श केला होता. त्यांच्या स्वप्नातले जागतिक धोरण त्यांनी विवादाच्या निमित्ताने अमेरिकन जनतेसमोर मांडले. वंशद्वेश व दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भविष्यातील नियोजन या विषयावर देखील सखोल मुद्दे सविस्तरपणे मांडले. वाद विवादात हिलरी क्लिटंन सरस ठरल्या होत्या.

मात्र, त्या निवडणुकीतही विकसित म्हणवून घेणाऱ्या अमेरिकन जनतेने धार्मिकता आणि कट्टर राष्ट्रवाद याला महत्व दिले होते. आता तेथील जनतेला हिलरी यांची अनेकदा आठवण येते. कारण, ट्रम्प यांच्या काळात अजूनही विशेष काहीच त्या देशात घडले नाही. सरकारी आकडे फ़क़्त फुगविले जात असल्याचे चित्र तिथेही आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*