ग्लोबल फार्मिंग | त्या देशात पीककर्ज मिळत होते मोफत..!

पाकिस्तान पिक कर्जावर घेत नव्हते व्याज
अन्न सुरक्षा ही पाकिस्तानला भेडसावणारी प्रमुख समस्या आहे. कराची, इस्लामाबादमध्ये भुकबळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अन्न सुरक्षा साखळी सुरळीत करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान सरकारने काही राज्यांतील शेतकऱ्यांना पिक कर्जावर कोणतेही व्याज आकारणार नसल्याची भूमिका घेतली होती. काही ठिकाणी अजूनही याची अंमलबजावणी होत असल्याचे समजते.
लाहोरचे मुख्यमंत्री शहाबाज शरीफ यांनी पिक कर्ज या विषयावर त्यांची भुमिका स्पष्ट केली होती. पाकिस्तानातल्या लाहोर प्रांतात शेतकर्यांना मोफत पिक कर्ज देण्यास सुरवात केली होती. येथे पिक कर्ज देण्यासाठी लाखो रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

श्रीलंकन फळांना जगभरात मागणी
श्रीलंकेतील समुद्र किनार्यावर येणार्या फळांना जगभरात मागणी वाढत आहे. कँडी परिसरातील नारळांना जगभरातून पसंती मिळत आहे. नारळातील पाणी व मलईला विशेष मागणी असल्याचे श्रीलंकन कृषी विभागाचे म्हणने आहे. सरकारच्या वतीने प्रक्रीया केलेले नारळ पाणी व मलई स्वंतत्र पणे निर्यात करण्याची योजना अगामी काळात राबवणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतमाल प्रक्रीया यंत्रांसाठी चीनची विशेष तयारी
भारत, बांगलादेश, श्रीलंका व पाकिस्तानातील शेतमाल प्रक्रीया उद्योगांचा वाढत्या कलाचे सर्वेक्षण चीन द्वारे नुकतेच करण्या आले आहे. सर्वेक्षणाद्वारे अल्प किंमतीच्या प्रक्रीया उद्योगांच्या मशिनरींची वरील देशांची मागणी असल्याचे सर्वेक्षण अधिकार्यांनी नमुद केली आहे. वरील मागणीचा आढावा घेवून चीन सरकारच्या वतीने अत्यल्प दरातील प्रक्रीया करणार्या मशिनरींचे निर्माण करण्यास सुरवात केली आहे. आगामी काळात याच मशिनरी भारतीय बाजारपेठेत स्थान निर्माण करतील. हे भारतीय यंत्र कंपन्यांना मोठे आव्हान असेल.

लेखक : विशाल केदारी (मुक्त पत्रकार)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*