ग्लोबल फार्मिंग | म्हणून तिकडेही दुग्धोत्पादनाला आहे महत्व

शेतीप्रधान देश म्हणवून घेतल्या जाणाऱ्या भारत देशात शेतकरी देशोधडीला लागतो की काय असे नकारात्मक चित्र आहे. त्याचवेळी इतर देश आपापल्या पद्धतीने शेतीच्या समस्यांवर मत करीत आहेत. त्याचाच घेतलेला थोडक्यात आढावा…

चिलीमध्ये पशुसंवर्धन शिक्षणासाठी विशेष संधी
गेल्या दशक भरापासून कृषी शिक्षणाकडे चीली विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली होती. कृषी शिक्षणातील वाटा सुधारण्यासाठी चीली सरकारच्या वतीने विशेष संधी निर्माण केली आहे. ग्रामिण भागाच्या विकासावर अधारीत अभ्यासक्रमाला यामध्ये विशेष स्थान दिले आहे. ग्रामिण भागातील युवतींना कृषी शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी अनेक उपक्रम सरकारच्या वतीने राबविले जात आहेत. दुध उत्पादन वाढीसाठी सरकारच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. दुध उत्पादनाची व्याप्ती व सेंद्रीय दुधाला चालना या बांबीवर चिली मध्ये दुधाचे भवितव्य अवलंबून आहे.

थायलंडच्या महिलांसाठी प्रक्रिया उद्योग
थायलंड सरकारच्या वतीने ग्रामविकासाच्या उपक्रमा अंतर्गत एक गाव एक पिक ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच पिकावर अधारीत प्रक्रीया उद्योग उभारणीत महिलांचा वाटा साठ टक्के ठरविण्यात आला आहे. ग्रामिण महिलांना त्यांच्या गावातच रोजगार उपलबद्ध झाला पाहीजे या उद्देशाने प्रक्रीया उद्योगाचे अद्यावत मॉडेल तयार करण्यात आले आहे. सन 2020 पर्यंत 80 हजार महिला प्रक्रीया उद्योजक निर्माण करण्याचे धोरण थायलंड सरकारच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे.

कॅनडीयन शेतकर्यांची जागतिक भरारी
दुसर्या महायुद्धात कॅनाडाचा ग्रामिण प्रदेशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महायुद्धानंतर कॅनडाने प्रामुख्याने ग्रामिण भागावर लक्ष केंद्रीत केले होते. सक्षम शेतकर्यांबरोबरच सक्षम खेडी निर्माण करण्यात कॅनडा प्रशासनाला यश मिळाले होते. कृषी तंत्रज्ञानाचे दर्शन कॅनडामधील शेती पाहताना होते. स्थानिक मार्केटमध्ये शेतकर्यांना सक्षम होईल असा बाजार भाव सध्या मिळतो आहे. कॅनडामध्ये सध्या कृषी व्यवसाय हा प्रतिष्ठेचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. ग्रामविकासाच्या अद्यावत धोरणाची निश्चिती कॅनेडीयन सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. धोरणांची निश्चिती करताना स्थानिक शेतकर्यांना परदेशी मार्केट उपलबद्ध करण्यासाठी सरकारने एक सक्षम धोरण स्विकारले आहे. धोरणामध्ये अशिया व अफ्रिकन देशांमध्ये शेतमाल पाठविणे अनुकूल असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. अफ्रिकन देशांची व अशियन देशांची गरज निश्चित करुन पिक पद्धतीत बदल करण्याच्या सुचना कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकर्यांना निर्यातक्षम कृषी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजन कॅनेडीयन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कुपोषण रोखण्यासाठी, केनियात दुध उत्पादनाला चालना
ग्रामिण केनियाला गरिबीने ग्रासले आहे. गरिबीचा फटका प्रामुख्याने शेतकर्यांना बसत असल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले होते. चार वर्षात ग्रामिण केनियाचा विकास दर वाढविण्यासाठी सरकराच्या वतीने पशुपालकांची मदत घेण्याचे ठरविले आहे. प्रगतशील पशुपालक अन्य पशुपालकांना त्यांच्या दुध उत्पादनाच्या प्रगतीच्या माहितीचे अदान प्रदान करणार आहेत. गेल्या चार वर्षात पशुपालक शेतकर्यांच्या पुढाकारामुळे ग्रामिण केनियाच्या विकास दरात वाढ झाली असल्याचे केनियन सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लेखक : विशाल केदारी (मुक्त पत्रकार)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*