रेसिड्यू फ्री शेती मिटवेल हमीभावाची समस्या : डॉ. गाडगे

अहमदनगर :जागतिक बाजारात विषमुक्त अर्थात रेसिड्यू फ्री शेतमालास मोठी मागणी आहे. योग्य पीक व्यवस्थापन आणि बाजारपेठ अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. अशी शेती करणाऱ्यांना हमीभावपेक्षा जास्त भाव नक्कीच मिळतो, अशी माहिती युवा शास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल गाडगे यांनी दिली.शुक्रवारी (दि. 10 मे) नगरमध्ये हॉटेल यश पॅलेस येथे आयोजित शेतकरी स्वावलंबन कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यशाळेत शेतीमालाचा उत्कृष्ट EXPORT QUALITY दर्जा कसा राखावा, सेंद्रिय शेती, Residue free आणि निर्यातक्षम शेती उत्पादन कसे करावे याविषयी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी कमीत कमी खर्चात घरच्या घरी कांदा, डाळिंब, भाजीपाला, कापूस, सोयाबेन, टोमॅटो, मका आदी पिकांसाठी टॉनिक, ह्युमिक, अमिनो, सेंद्रिय खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, ग्रोथ हार्मोन्स, दशपर्णी अर्क बनविण्यासाठी/निर्मितीसाठी डॉ. गाडगे यांनी सहभागी शेतकरी यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.सोबतच दुष्काळी फळबाग संगोपन, सनबर्न, डाळिंबावरील तेल्या, हुमणी तसेच नेमाटोड यांचे पूर्ण व्यवस्थापन या या विषयावरही डॉ. गाडगे यांनी संवाद साधला. दुसऱ्या सत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे अभ्यास सहल आणि याठिकाणी प्रा. अण्णासाहेब नवले (वनस्पती रोगशास्ञ आणि सूक्ष्म जीवशास्त्र) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदिप देशमुख, संदिप वाघ, सचिन चोभे, हनुमंत पोकळे, राहुल गाढे आदींनी परिश्रम घेतले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*