म्हणून खायचा असतो कांदा..!

कांदा म्हटले की राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे पिक, असेच चित्र आपल्यासमोर येते. कांद्याला भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी संकटात असतात, तर जास्त भाव मिळाला की मध्यमवर्गीय समाज दुखावेल म्हणून सरकार हस्तक्षेप करून कांद्याचे भाव पाडते. या दुष्टचक्रात अडकलेल्या कांद्याला आहारशास्त्रात मात्र महत्वाचे स्थान आहे. त्याबद्दल थोडक्यात…

‘खाशील कांदा तर होईल वांदा’ अशी म्हण ग्रामीण तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. होय, कच्चा कांदा सलाद म्हणून किंवा जेवणात तोंडी लावताना खाल्ल्याने लैंगिक शक्ती वाढत असल्याचे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. मात्र, कांद्याला फ़क़्त लैंगिकदृष्ट्या महत्व आहे असे नाही. इतरही अनेक बाबींसाठी कांदा महत्वाचा आहेच की..

रक्त शुद्ध करणारा, पोटाची स्वच्छता करणारा, लघवीची जळजळ कमी करणारा, उन्हात शीतलता देणारा, मिरगी आल्यास नाकाला हुंगल्यावर शुद्धीवर आणणारा, नाकातील रक्त बंद करणारा, अनिद्रा दूर करणारा अशा पद्धतीने अनेक उपयोगाचा म्हणून कांद्याची ओळख आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*