मागील पाचही वर्षे चुकलाय हवामान अंदाज..!

हवामान विभागासह देशातील मान्सून पावसाचा अंदाज स्कायमेट आणि काही इतर खासगी संस्था जाहीर करतात. या संस्थांच्या अंदाजावर शेतकरी आणि कृषी कंपन्या यांचे आगामी खरीप व रब्बी हंगामाचे बजेट ठरते. मात्र, या संशोधन संस्थांच्या अंदाजावर शेती करणे कितपत योग्य, असाच प्रश्न निर्माण झालेला आहे. खासगी आणि सरकारी अशा दोन्ही संस्थांचे मागील पाच वर्षांतील मान्सूनच्या पावसाचे अंदाज बऱ्यापैकी चुकले आहेत हे विशेष…

२०१४ ते २०१८ या कालावधीत भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट यांनी जाहीर केलेल्या अंदाजात बऱ्यापैकी तफावत आहे. तरीही यापैकी एकही संस्थेचे अंदाज आणि त्या वर्षी झालेला पाऊस यांची आकडेवारी काही जुळू शकली नाही. एकूणच देशातील हवामानशास्त्र आणि संशोधक नेमके काय करीत आहेत आणि त्यांच्या भरवशावर शेती क्षेत्राचे काय होणार आहे याचाच अंदाज या आकाड्यांतून येतो. सरकारी पैशांवर चालणाऱ्या हवामान विषयक संस्था नेमक्या काय दिवे लावतात, याबद्दल त्यामुळेच शेकरी संघटना अनेकदा आक्रमक झालेल्या आहेत.

मागील पाच वर्षांतील हवामान अंदाजाची आकडेवारी (% टक्केवारी) अशी :
वर्ष ———झालेला पाऊस —-हवामान विभाग —–स्कायमेट
२०१४————८८——————९६———————- ९४
२०१५————८६——————-९३——————— १०२
२०१६————९७——————-१०६——————–१०५
२०१७————९५——————-९८———————-९५
२०१८————९१——————–९७———————१००

भारतीय हवामान विभाग या संस्थेचा अंदाज मागील पाचही वर्षांत चुकलेला आहे. तर, स्कायमेट या खासगी संस्थेचा अंदाज २०१७ या वर्षी तंतोतंत बरोबर आलेला आहे. अंदाजात २-३ टक्के खाली-वर होऊ शकते. मात्र, अनेकदा हा फरकाचा आकडा १० टक्क्यांपर्यत पोहचला आहे. सरकारी अनुदान व प्रकल्पावर चालणाऱ्या संस्थांकडून अशी चुकीची आणि दिशाभूल करणारी आकडेवारी प्रसिद्ध होत असूनही त्यावर काहीच कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. त्याबद्दल शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*