परभणी कृषी विद्यापीठात शनिवारी पिक परिसंवाद

परभणी :

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (दि.१८ मे) सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात खरीप शेतकरी मेळावा, पीक परिसंवाद, कृषी प्रदर्शन यांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

या कार्यक्रमात आदर्श शेतकरी पांडुरंग इनामे, भरत आहेर, वसंतराव नाईक शेतीमित्र पत्रकार संतोष देशमुख, पत्रकार विजय चौधरी, महिला शेतकरी सुनंदा क्षीरसागर, शेतीनिष्ठ शेतकरी दीपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास कृषी सचिव एकनाथराव डवले, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार पाटील आदि अधिकारी व पदाधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*