बीडमध्ये चाराघोटाळा; कोण खात असेल चारा..?

बीड :

कोणतीही योजना मुळासकट खाण्याचा प्रकार मराठवाडा भागात सहजशक्य आहे. यापूर्वी विहिरी, जलसंधारण, शेततळे गायब करून अनुदान लाटणाऱ्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आता पुन्हा एकदा चारा घोटाळा उघडकीस आला आहे. चारा खाणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेता आणि वरदहस्त कोण, याची उत्सुकता आता राज्याला लागली आहे.

राज्यभरात कमी दुधाचा पुरवठा असूनही बीड जिल्ह्यात चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या मात्र भरमसाठ वाढली होती. जिल्हा प्रशासनातील काही मंडळींनी आपला हात साफ करताना गावोगावच्या छावणी चालकांना हाताशी धरले होते. राजकीय व प्रशासकीय वरदहस्तामुळेच हे शक्य झाले. मात्र, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या सजगतेमुळे हा घोटाळा उघडकीस आला. त्याची दाखल घेऊन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी छावण्यांच्या तपासणीसाठी २० विशेष पथकांची नियुक्ती केली.

प्रशासकीय पथके नियुक्त झाली की तातडीने जिल्ह्यातील सुमारे १४ हजार जनावरे छावणीच्या बाहेर गेली आहेत, हे विशेष. छावान्यांनी जनावरांची संख्या २-३ दिवसांत कमी दाखवून सारवासारव सुरू केली आहे. त्यामुळे अशा छावण्या प्रशासनाच्या विशेष रडारवर आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई होणार का, आणि चारा खाणारे राजकीय नेते यात अडकणार की सुटणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*