शीतल व वजन कमी करणारा आरोग्यदायी सब्जा..!

तुळशीला आपल्याकडे सांस्कृतिक आणि धार्मिकता यात मोठे स्थान आहे. त्याच कुळातील आणि तुळशीसारखी दिसणारी आणि आरोग्यदायी वनस्पती म्हणजे सब्जा होय. उन्हाळ्यातच नाही, तर प्रत्येक ऋतूमध्ये सब्जा हा आरोग्यासाठी महत्वाचा आहे. किराणा दुकानात याच्या बिया सहजपणे विकत मिळतात. त्याच आणून घरच्याघरी आपण याचे औषधी गुणधर्म उपयोगात आणू शकतो.

याला हिंदी पत्त्यात फालुदा बीज म्हणतात. नाव कुठेही याचे बदलत असले तरी गुणधर्म आणि महत्व मात्र कुठेही कमी होत नाही. त्यामुळेच अनेक शेतकरी या बियांचे व्यावसायिक उत्पादन घेतात. उन्हाळ्यात शरीरातील तापमान कमी करून शीतलता आणि दिलासा देण्याचे काम हा सब्जा करतो. त्यामुळेच सरबत आणि विविध रसांमध्ये सब्जा वापरला जातो. त्याच्या काळसर बिया पाहून काहींना याची किळस वाटते. मात्र, महत्व जाणून घेणारा कोणीही सब्जा पिण्यास नकार देणार नाही हे नक्कीच…

सब्जामध्ये प्रोटीन, फायबर, ओमेगा ३ फैटी असिड, जीवनसत्व अ आणि क असतात. याचे सरबत पिल्याने शरीराला आल्हाददायक वाटून टेन्शन कमी होते. डोकेदुखीचा त्रास असलेल्यांना याचा फायदा होतो. तसेच कोमट पाण्यात १५ मिनिटे सब्जा भिजवून पिल्यास वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. ग्रीन टी, सलाड आणि सूप यामध्येही हे बीज टाकून खाल्ल्याने फायदा होतो. पचनशक्ती वाढविण्यासह याच्या बिया शरीरातील विषारी व हानिकारक घटक बाहेर टाकण्यासाठी मदत होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*