दुष्काळी मदतीसाठीच्या निकषात महत्त्वपूर्ण बदल..!

मुंबई :

राज्यातील दुष्काळाची दाहकता कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्याबद्दल उच्च न्यायालयाने अहवाल मागितल्याने आता राज्य सरकारला खऱ्या अर्थाने जाग आली आहे. त्यानुसार यापुढे आमदार निधी दुष्काळ निवारण कामासाठी वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबद्दल माहिती देताना ही महत्वपूर्ण घोषणा केली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तसेच लोकसभा निवडणुकीत पक्षाने राज्यात केलेल्या कामाबद्दल आयोजित बैठकीत त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. पुढील कालावधीत पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी गावोगावी जाऊन दुष्काळी भागात काम करण्याच्या सूचना पक्षाने दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुनगंटीवार यांनी दिलेल्या आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*