किडरोग व्यवस्थापनासाठी वापरा मल्चिंग

नाशिक :

कपाशीवरील बोंडअळी आणि मका पिकावर नव्याने हल्ला चढवीत असलेली लष्करी अळी यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापनासह मल्चिंग पेपर वापरण्याची गरज आहे. तसेच मटका पध्दत, फळबाग छाटणी अशाही उपाययोजना कराव्यात, असे आवाहन मालेगावचे तालुका कृषि अधिकारी गोकुळ अहिरे यांनी यांनी केले.

कृषि विभागाकडून बीटी कपाशीवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीच्या व्यवस्थापनसाठी चिखलओहोळ ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यशाळा व मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मका पिकावरील लष्करी अळी, दुष्काळ काळात किडीचा प्रतिबंध व उपाययाेजना, पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, खरीप लागवड व पूर्वतयारी नियोजनाबाबत खते, बी-बियाणे, कीटकनाशके खरेदी, फेरोमन ट्रॅप्स, निंबोळी अर्क तयार करणे व वापर यांचीही माहिती देण्यात आली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*