Blog | अमेरिकेत ‘गांधी गोइंग ग्लोबल’ महोत्सव; जळगावच्या ‘गांधीतीर्थ’चाही सहभाग

जळगाव म्हटले की सगळ्यांना आठवते जैन इरिगेशन कंपनी आणि त्यांचे गांधीतीर्थ. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेऊन समाजाला सकारात्मक उर्जा देण्याच्या उद्देशाने भवरलाल जैन (भाऊ) यांनी गांधी रिसर्च फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली. जैन हिलवरील ही संस्था आता अमेरिकेतील न्यू जर्सी येथेही गांधीयन सोसायटीच्या मादातीने ‘गांधी गोइंग ग्लोबल’चा जागर करणार आहे.

महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अमेरिकेत ‘गांधी गोइंग ग्लोबल’ हे विशेष प्रदर्शन अयोतीत करण्यात आले आहे. दि. २४ ते २६ मे या कालावधीत होणाऱ्या जागतिक प्रदर्शनात देशोदेशीच्या महत्वपूर्ण संस्था, विचारवंत, लेखक व कलाकार सहभागी होत आहेत. त्यामध्ये गांधी रिसर्च फाउंडेशन ही संस्थाही सहभागी होणार आहे. संस्थेचे संचालक अशोक जैन यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर समाजसेवक अरुण गांधी, सैम पित्रोदा आणि इतर देशोदेशीचे विचारवंत यामध्ये आपले विचार मांडणार आहेत.

महात्मा गांधीजींच्या जीवनकार्याचा व विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या जगभरातील संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे न्यू जर्सीच्या टपाल विभागाचा शिक्का असलेल्या विशेष पाकिटाचे अनावरण यामध्ये केले जाणार आहे.

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग (मो. ९४२२२१५६५८)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*