टोमॅटोचे भाव ९०० रुपये/क्रेट

मुंबई :

पावसाळ्याच्या तोंडावर मॉन्सूनपूर्व पावसामुळे दक्षिण भारतात टोमॅटोसह भाजीपाला पिकाचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या चेन्नई शहरात मार्केट कमिटीत टोमॅटोचे भाव ९०० रुपये क्रेट (२० किलो) झालेले आहेत.

दक्षिण भारताप्रमाणेच उत्तर भारतातही या फळभाजीचा मागणीच्या तुलनेत तुटवडा असल्याने रसदार फळाचे भाव वाढलेले आहेत. पुण्यात टोमॅटोचे भाव ५०० रुपये क्रेट आहेत. तर, गुजरात राज्यात सुरतमध्ये ७०० रुपये आणि अहमदाबाद येथे ५३० रुपये क्रेट या दराने मार्केट यार्डमध्ये विक्री होत आहे. तर, किरकोळ भाजी बाजारात त्यातही भर पडून टोमॅटोचे भाव ४० रुपये किलो झालेले आहेत.

देशातील प्रमुख बाजार समितीमधील टोमॅटोचे क्रेटचे भाव असे : दिल्ली ५४०, चंदिगढ ५२५, नाशिक ५००, मुंबई ३१०, निजामाबाद ७७०, बंगळूर ८५०, म्हैसूर ६५०, नागपूर ६००, इंदोर ३५० आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*