कांद्याच्या बाजारात तेजी, किरकोळ भाववाढ; पहा बाजारभाव

पुणे :

भाजीपाला पिकामधील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशील पिक असलेल्या कांद्याचे भाव बाजारात काहीअंशी वधारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आता कांद्याचेही भाव वाढल्याने उत्पादकांना किमान दिलासा मिळाला आहे. मात्र, सरासरी १०० रुपयांची ही भाववाढ टिकणार की पुन्हा एकदा मृगजळ ठरणार, हे सरकारी धोरणावरच अवलंबून आहे.

सरासरी ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल यावर स्थिरावलेल्या कांद्याचे भाव देशभरात १०० ते २०० रुपयांनी वाढले आहेत. मात्र, आता ही भाववाढ व्यापाऱ्यांचा उपयोगी ठरली आहे. कारण, अनेकांनी दुष्काळात खर्चासाठी पैसे नसल्याने पडेल भावात कांदा विकला होता. तर, अनेक शेतकऱ्यांनी कांदा वखारीत ठेवला आहे. हाच कांदा काढेपर्यंत बाजारातील भाव टिकले तरच उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन येणार आहेत.

सध्या प्रमुख बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव असे (भाव रुपये प्रतिक्विंटल यामध्ये, तर कंसामध्ये आवक) : कोल्हापूर ४००-१२०० (५०६३), मुंबई १२००-१३५० (९६६०), जुन्नर-आळेफाटा ५००-९०० (६२६५), सोलापूर १००-१००० (५६०१), पुणे ६००-१२०० (१३४७०), येवला ३००-११०० (५०००), लासलगाव ५००-११०० (६०००), निफाड ४५०-१०४१ (५८०), मालेगाव ३०५-१११० (६०००), कळवण ४००-११५० (६८००), श्रीरामपूर ५५०-९५० (१०८२), पिंपळगाव बसवंत ३००-११०० (२१२२०), पारनेर ३००-१३०० (२८०५), राहाता २००-१४०० (१२३०१), कोल्हापूर ६००-१५०० (२४६३) आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*