Blog | जोडला जावा शेतकरी सम्रुद्धीचा त्रिकोण

कृषी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेतकरी बैठकांना किंवा सेमिनारमध्ये गेलो की तिथे उत्पादनवाढीसाठी कंपन्या करत असलेल्या प्रयत्नांबद्दल बोलले जाते. शेतकर्यांना मिळणारे बियाणे, खते, उपकरणे दर्जेदार असावेत याबद्दल गंभीर चर्चा होते. शेतकर्यांचे उत्पादन कसे वाढेल यासाठी कंपन्यांचे संशोधन अन विकास विभाग किती कष्ट घेतात याबद्दल चर्चा होते. शेतकर्यांना नविन तंत्रज्ञानावर प्रशिक्षण देण्याबाबत चर्चा होते. एकुणात शेतकरी संपन्न व्हावा म्हणुन काय करता येईल यावर बोलले जाते.

याउलट, राजकीय पक्षांच्या शेतकरी मेळाव्यात गेलो की, शेतकर्यांना काय फुकट देता येईल म्हणजे त्यांची मते फुकटात मिळवता येतील यावर बोलले जाते. वीज, पाणी, सबसिडी फुकट देवुन, कर्ज माफी (?) देवुन शेतकरी राजकीय द्रुष्ट्या कसा वापरता येईल यावर राजकीय पक्ष डोळा ठेवुन असतात.

दोन्हीकडील हे टोकाचे चित्र पाहिले की, जो मुळ शेतमालाला योग्य भाव मिळणे, हमी भावाचा मुद्दा मात्र दोन्हिकडे टाळला जातोय, हे लक्षात येते. कृषी क्षेत्रातील कंपन्यांनी शेतकर्यांना दर्जेदार उत्पादन देणारी उत्पादणे बनवण्या सोबतच जर त्या उत्पादणांना विक्रिसाठी देखिल काही योजना बनवली तर चित्र अजुन हिरवेगार होईल. कृषी क्षेत्रातील कंपन्यांचे ज्ञान जर विपनन विभागात काही प्रमाणात वापरले तर कंपन्यांची थोडी सम्रुद्धी कमी होइल पण शेतकरी सम्रुद्ध व्हायला थोडी मदत होईल.

कृषी उत्पादणांच्या दर्जामध्ये सुधारणा करायला खुपच वाव अाहे. एका रिपोर्टनुसार १४ कोटी लिटर दुध उत्पादन करणारा आपला देश दररोज ६४ कोटी लिटर दुध पितो! म्हणजे दररोज ५० कोटी लिटर ‍विष आपण पितोय अन पचवतोय! कँसरसारखे आजार भयावह पद्धतीने सर्वत्र वाढताना दिसतात. हे त्याचेच कारण आहे. माझ्य़ा परिचित एक पोलिस अधिकारी कधिही दुध टाकुन चहा पित नाहीत, ते यामुळेच कदाचित!

हा दर्जा सुधारण्यासाठी जी गुंतवणुक करणे अावश्यक आहे, ती मात्र होताना दिसत नाही. गुंतवणुकदारांना या सुक्ष्म गोष्टींमधे रस नाही. त्यांना अाज टाकलेला पैस उद्या दुप्पट झालेला पाहिजे असतो. कृषी वा अन्न प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणुकीला परतावा मिळायला तीन वर्षे तरी लागतात. इतके थांबायची गुंतवणुकदारांची तयारीच नाही. त्यामुळे नवे तंत्रज्ञान या क्षेत्रत येवु शकत नाही.

दर्जा नाही म्हणुन भाव नाही अन गुंतवणुक नाही म्हणुन दर्जा नाही, या दुष्टचक्रात कृषी व अन्नप्रक्रिया क्षेत्र गुरफटलेले आहे. राजकीय नेते, कृषी कंपन्यांचे व्यवस्थापण अन शेतकरी हे त्रिकोनाचे तीन कोन पुढील काळात ६० डिग्रीमध्ये जोडले जावेत, ही अपेक्षा!

लेखक : डाॅ. भारत गंगाधर करडक,
करडकवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*