अशी असेल मॉन्सूनची स्थिती; डॉ. साबळे यांचा अंदाज

पुणे :
ऑक्टोबर, नोव्हेंबर या दोन्ही महिन्यात महाराष्ट्र राज्यात चांगला परतीचा पाऊस होणे शक्य आहे. मात्र, मान्सूनच्या आगमनास उशीर होणार असल्याने जून महिन्यात पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विषयातील अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.

यंदा राज्यात सरासरीच्या तुलनेत कोकणात ९०, पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात ९५, उत्तर महाराष्ट्रामध्ये ९७, मराठवाड्याच्या भागात ९५, पूर्व विदर्भात ९८, मध्य विदर्भामध्ये ९८ तर, पश्चिम विदर्भातही ९५ टक्के पाऊस पडेल. आताही वाऱ्याचा वेग तुलनेने कमी आढळल्याने जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये राहुरी, कोल्हापूर, धुळे, जळगाव, परभणी या भागात पावसात मोठे खंड पडतील. सोलापूर, पुणे, निफाड, अकोला, सिंदेवाही, दापोली, पाडेगाव व नागपुर भागामध्ये खंडीत वृष्टी राहील असा अंदाज आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*